फलटण दि. ३ : फलटण शहर व परिसरात आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळी ओळख कै. सुभाषराव निंबाळकर यांनी निर्माण केली होती. सामाजिक व राजकीय क्षेत्रात कामाच्या माध्यमातून त्यांनी असंख्य मित्र परिवार जोडला असल्याने त्यांची उणीव सतत जाणवत असल्याचे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात कै. सुभाषराव निंबाळकर यांची उणीव जाणवते : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
येथील सामाजिक कार्यकर्ते व साप्ताहिक सुभाषित चे संपादक कै. सुभाषराव निंबाळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथील वसतीगृहातील मुलांना २० काटचे वितरण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे आर. व्ही. निंबाळकर, भोजराज नाईक निंबाळकर, रमणशेठ दोशी, शरदराव रणवरे, चंद्रशेखर जगताप, सरव्यवस्थापक प्राचार्य अरविंद निकम, लायन्स क्लब अध्यक्ष अर्जुन घाडगे, लायन्स डिस्ट्रिक्ट चेअरमन सुहासराव निकम, राजीव नाईक निंबाळकर, राजेंद्र कापसे, बोंद्रे, सागर निंबाळकर, नगरसेवक अनिल शिरतोडे, प्रतापसिंह निंबाळकर, प्रमोद निंबाळकर, प्राचार्य हंकारे, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, वसतीगृहाचे अधिक्षक आर. बी. सोनवलकर यांची उपस्थिती होती.
कै. का. हरिभाऊ निंबाळकर यांचा सामाजिक वारसा कै. सुभाषराव निंबाळकर यांनी जपला आणि तोच विचार व वारसा सुभाषराव यांचे ३ पुत्र प्रतापसिंह, प्रमोद व निलेश निंबाळकर कुटुंबिय पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
विधान परिषद सभापती श्रीमंत ना. रामराजे नाईक निंबाळकर, कषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निंबाळकर बंधू कार्यरत असून आज वडील कै. सुभाषराव निंबाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ छोटीशी भेट म्हणून श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय येथील वसतीगृहातील मुलांसाठी २० काट भेट म्हणून देण्यात येत असल्याचे माळजाई मंदिर उद्यान कमिटी ट्रस्ट चेअरमन प्रतापसिंह निंबाळकर यांनी प्रास्ताविकमध्ये स्पष्ट केले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर प्रतिकात्मक एक काटचे वितरण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचेकडे सुपुर्द करण्यात आले.
कार्यक्रमास विजय लोंढे पाटील यांच्यासह श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नागरिक व वसतीगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.
शेवटी बांधकाम व्यावसायिक प्रमोद निंबाळकर यांनी आभार मानले.