फलटण दि. २ : कापशी येथील अमोल कुमार शिंदे यांचे राहते घरी विक्रीसाठी आणलेल्या सुमारे २६ हजार रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या पोलीसांनी जप्त करून लोणंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून शिंदे याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशन यांच्यावतीने देेण्यात आलेल्या माहितीनुसार सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांना खबरामार्फत माहिती मिळालीनुसार कापशी ता फलटण येथील अमोल कुमार शिंदे (वय- 30) याने दारूबंदी असताना विना परवाना आपल्या राहते घराचे शेजारील जुने घरामध्ये दारूच्या बाटल्या विक्रीसाठी आणुन ठेवल्या आहेत. त्यानंतर संतोष चौधरी , पोलीस हवालदार भोसले ,पोलीस कॉन्स्टेबल शेख ,पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, चालक पोलीस शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता मेगडॉनल नंबर वनच्या 180 मिलीच्या 48 बाटल्या किंमत 150 रुपये प्रति नग = 7200/-, इम्पेरियल ब्लू च्या 180 मिलीच्या 66 बाटल्या किंमत 140 रुपये प्रति नग =9240/ -, सखु संत्रा देशी दारूच्या 180 मिलीच्या 196 बाटल्या किंमत 52 रुपये प्रति नग= 10192/ अशा एकूण= 26632/- किंमतीच्या दारूच्या बाटल्या व संशयितास ताब्यात घेऊन लोणंद पोलीस स्टेशनला त्याला आणून गुन्हा दाखल केला.