फलटण दि. २ : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, NCERT, SCERT, शिक्षण विभाग सातारा, विद्या प्राधिकरण पुणे, मुंबई या शिक्षण क्षेत्रातील नामवंत संस्था व यशदा पुणे येथे जावून स्वतःची ज्ञानलालसा पुर्ण करुन घेणे गरजेचे आहे. भारताला जर महासत्ता बनवावयाचे असेल तर ज्ञानाच्या कक्षाही जागतिक पातळीवरील स्विकारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सासवड ता.फलटण येथील महात्मा विद्यालय ज्युनियर कॉलेजचे प्रा. नितीन नाळे यांनी केले.
शैक्षणिक गुणवत्त वाढ करण्यासाठी शिक्षण विभाग जिल्हा परिषद सातारा, शिक्षण विभाग पंचायत समिती खटाव व डी.आय.इ. सी.पी.डी.सातारा यांचे संयुक्त विद्यमाने केंद्रशाळा डिस्कळ ता खटाव येथे शिक्षण परिषद संपन्न झाली.
शाळेत शैक्षणिक वातावरण निर्मिती करावी, शिक्षक हा कलाकार असून शिक्षणातुन लोक चळवळ निर्माण व्हावी. विचार व भावनांची देवाण घेवाण करतो तोच खरा शिक्षक असतो. शिक्षकांनी वेळप्रसंगी अध्यापणात गायन,वादन,अभिनय, कविता, हावभाव, प्रभावी संभाषण कौशल्याचा उपयुक्त वापर करावा असे आवाहन प्रा. नाळे यांनी केले.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार झालेल्या बदलांची अध्यापनात अंमलबजावणी करावी, नवागतांचे स्वागत, दिनविशेष, माझी शाळा व उपक्रम या राबविलेल्या स्वहस्ताक्षरात नोंद करून विद्यार्थ्यांचा व्यासंग वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन , मानवतावादी मुल्ये विकसित करणे गरजेचे असुन शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक प्रवाहाच्या दिशेने स्वतःहालाही अपडेट ठेवणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी D.I.E.C.P.D.चे ज्येष्ठ अधिव्याख्याता, व पब्लिक स्कूल पुसेगावचे प्राचार्य वसेकर, केंद्रप्रमुख. अनिल कदम यांच्यासह ललगुण केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.