फलटण : येथील मुधोजी महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक, फलटण ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक शरद इनामदार यांचा अमृत महोत्सव सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
अमृतमहोत्सवा निमित्त त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. याकार्यक्रम प्रसंगी त्यांनी लिहिलेल्या “आमची देश-विदेशातील भटकंती” या पुस्तकाच्या तिसऱ्या भागाचे प्रकाशन श्री सद्गुरु संस्था समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले, प्राचार्य विश्वासराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सनग्राफिक्स प्रमुख उमेश निंबाळकर, सौ.शिल्पा इनामदार यांच्यासह इनामदार कुटुंब उपस्थित होते.
सर, आप जिओ हजारो साल…..