प्रतापसिंह निंबाळकर यांची फलटण येथील माळजाई मंदिर उद्यान कमिटी ट्रस्ट चेअरमन पदी निवड

फलटण दि. १ : येथील सामाजिक कार्यकर्ते व सन्मित्र गणेशोत्सव मंडळ नाना पाटील चौक फलटणचे अध्यक्ष प्रतापसिंह सुभाषराव निंबाळकर यांची लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर उद्यान कमिटी ट्रस्ट, फलटण चेअरमन पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
प्रतापसिंह निंबाळकर हे गेल्या अनेक वर्षापासून फलटण शहर व परिसरात सामाजिक उपक्रमाद्वारे आघाडीवर राहून काम करीत असून सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक व वृत्तपत्र क्षेत्रात त्यांनी काम केले आहे.
फलटण शहर व परिसरात आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली असून वडील कै. सुभाषराव निंबाळकर व चुलते कै. का. हरिभाऊ निंबाळकर यांचा सामाजिक वारसा प्रतापसिंह निंबाळकर यांनी जपला असून बांधकाम व्यावसायिक भाऊ प्रमोद निंबाळकर व वकील भाऊ निलेश निंबाळकर यांच्या सहकार्याने पुढे नेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
राजकारणात विधान परिषद सभापती श्रीमंत ना. रामराजे नाईक निंबाळकर, कषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापसिंह निंबाळकर कार्यरत आहेत.
वडील कै. सुभाषराव निंबाळकर यांनी फलटण येथे साप्ताहिक सुभाषित नावाचे वर्तमानपत्र सुरु केले होते त्याची धुरा काही काळ प्रतापसिंह निंबाळकर यांनी समर्थपणे पेलली होती. 
सामाजिक कार्य करण्याची त्यांची प्रेरणा असून ते दि कराड अर्बन को. आपरेटिव्ह बँक लि कराड शाखा फलटण येथे शाखा सल्लागार, लायन्स क्लब फलटण सदस्य, सन्मित्र गणेशोत्सव मंडळ नाना पाटील चौक फलटण चे अध्यक्ष, काशी विश्वेश्वर टस्ट फलटण चे संचालक, महादेव मंदिर फलटण संचालक म्हणून कार्यरत आहेत.  प्रतापसिंह निंबाळकर यांची आता लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर उद्यान कमिटी ट्रस्ट चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल त्याचेवर विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!