फलटण दि. 30 : लोणंद ता खंडाळा येथील श्री काल भैरवनाथ डोंगरावर फिरायला जात असताना दर्शनाचा लाभ होत असे. शारीरिक व्यायाम याने आरोग्य उत्तम राहत असून आम्ही 20 / 25 जणांनी डोंगरवर वक्षारोपण केले त्याला 2 वर्षे पुर्ण झाली असून ही झाडे डौलाने उभी असल्याचे श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुप, लोणंदचा शशीकांत जाधव यांनी सांगितले.
श्री भैरवनाथ डोंगरावर सर्वांच्या सहकार्याने 50 झाडे डौलात उभी
श्री भैरवनाथ डोंगर मानिंग वाक ग्रुप लोणंद ता. खंडाळा व लोणंदकरनगरीचे ग्रामदैवत श्रीकाळ भैरवनाथ व भैरोबाच्या डोंगरावर दि. 29 ऑगष्ठ 2017 रोजी आम्ही दररोज सकाळी फिरायला जाण्यास सुरुवात केली त्याला काल 2 वर्ष पूर्ण झाली. प्रारंभी आम्ही फक्त 3 जण होतो . ही संख्या वाढत वाढत पन्नास,साठ वर गेली.आता ही संख्या 15/20 आहे. नवीन सवयीमुळे शाररिक व्यायाम चांगला होत आहे त्याचबरोबर दररोज श्री काळ भैरवनाथाचे दर्शनाचा लाभ होत आहे. खडकाळ डोंगरावर लावलेली वड, पिंपळ, गुलमोहर, पिंपरण आदी सुमारे पन्नास झाडे हिरवीगार व मोठी झालेली आहेत. आपणा सर्वाच्या सहकार्याने लावलेल्या ट्री गार्डमुळे कोणतीही हानी झाली नाही म्हणूनच ही झाडे उभी आहेत.
डोगरावर लावलेली झाडे गेली दोन वर्ष आम्ही व बालचमूंनी बिसलरी बाटली, कॅन , किटलीद्वारे झाडांना पाणी देवून ऐन उन्हाळ्यात ही झाडे जगविण्यात यशस्वी झालो. बहुतांश झाडांना ट्री गार्ड सर्वाच्या साथीने लावली गेली आहेत . आता 50 झाडे जगविण्याचे आव्हान आपणापुढे असून लोणंद येथील जास्तीत जास्त लोकांनी डोंगरावर येण्याची आवश्यकता असून पर्यावरणाचा आपणास लाभ मिळणार आहे.
फिरायला येणाऱ्या लोणंदकर यांना शरिराक व्यायाम होईल आपले वय व शाररीक परिस्थिती हा डोंगर चढल्यावर कळुन येते , श्री काळ भैरवनाथाचे दर्शन होते, डोंगरावरील झाडांना पाणी घालुन जगविण्याचे समाधान मिळुन पर्यावरण राखण्यास हातभार लागतो आणि महत्वाचे म्हणजे दिवसाची सुरवात अतिशय सुंदर होईल अशी अपेक्षा आहे.
श्री भैरवनाथाच्या डोंगराचा विकास करून कायापालट करण्याचे सर्वाचे स्वप्न असून हे स्वप्न येत्या काही दिवसात आपले सहकारी सदस्य विशेषत: अनिल कुदळे, प्राजीत परदेशी संदीप शेळके – पाटील यांच्याबरोबरच आपण सर्वजण व लोणंद नगरपंचायत,भैरवनाथ ट्रस्ट, वन खात्याचे अधिकारी जगताप मिसाळ यांच्या सहकार्याने पुणत्वास नेत आहोत. डोंगर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत करताना डोंगरावर झाडे लावणे, पाण्याची सोय करणे , लाईटची सोय करणे आदी कामाद्वारे व सुशोभिकरण करून पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आहे. यासाठी उपक्रमात सहभागी व्हावे ज्यांना दररोज शक्य आहे त्यांनी दररोज तर ज्यांना रविवार अगर सुट्टीच्या दिवशी शक्य आहे त्यानी सहभागी होऊन आपले शरीर तंदुरस्त ठेवण्याबरोबर आत्मीक समाधान व सामाजिक उपक्रमाद्वारे समाधान निश्चित लाभेल यात शंका नाही.
आम्ही फिरायला जाणारे सर्वाच्या सहकार्याने लवकरच श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुप, लोणंदचा दुसरा वर्धापनदिन साजरा करणार असल्याचे शशीकांत जाधव व मित्र मंडळी यांनी सांगितले.