फलटण दि. 29 : येथील शंकर मार्केट दहिहंडी उत्सव मंडळ व राजे ग्रुप, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षीही दि.25 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या स्पर्धेतील दहिहंडी फोडण्याचा मान गुणवडी ता.बारामतीच्या जय मल्हार गोविंदा पथकाने मिळवला आहे.
दहिहंडी स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण व युवा नेते श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष नानासाहेब नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ.प्रगतीताई कापसे, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, माजी नगरसेवक सुनील मठपती, सलीम शेख, प्रा.भिमदेव बुरुंगले, अनिल शिरतोडे, पोपटराव नाईक निंबाळकर, किशोर देशपांडे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गुणवडी ता.बारामती येथील जय मल्हार ग्रुप गोविंदा पथकाने 6 मानवी थर रचून दहिहंडी फोडण्याचा मान मिळवला. श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते रोख पारितोषिक व चषक बक्षीस देवून गौरविण्यात आले.
प्रारंभी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. शंकर मार्केट परिसरातील गणेशोत्सव मंडळांच्या नूतन अध्यक्ष यांचा ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दहिहंडी स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष, नगरसेवक किशोरसिंह (भैय्या) नाईक निंबाळकर, अभिजित निंबाळकर, अजहर शेख, अमोल नाळे, महेश सुतार, गणेश देशपांडे, अनिल वेलणकर, संतोष कर्वे, अभिषेक कुमठेकर, विश्वराज गांधी, निलेश पालकर, मोमीन इनामदार, मुन्ना कदम, तेजस खानविलकर, विशाल खानविलकर, हरीष कर्वे, ऋषिकेश कर्वे, कुणाल पैलवान, धनु पैलवान, आयान शेख, सुजित कापसे, बबलु पवार, मयुर हिरणवाळे, संतोष हिरणवाळे, अथर्व ढवळीकर, योगेश हिरणवाळे, गणेश महामुनी, दिनेश कर्वे, राघव देशपांडे, अक्षय कर्वे, गणेश कर्वे, अशुतोष केेंजळे, गोटू शिंदे, शुभम भोई, पंकज जांभळकर, वरद घाडगे, ओंकार देशपांडे, तुषार देशपांडे, दिलीप चवंडके, किरण निंबाळकर यांनी यशस्वीरित्या केले.
भाऊसोा कापसे, बाळासाहेब फुले, महादेव माने, सचिन तिवाटणे, जहांगीर आतार, सुनिल जंगम, नितीन तारळकर, तुषार नाईक निंबाळकर, जयंत सहस्त्रबुद्धे, शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आबा बेंद्रे, योगेश शिंदे, निलेश खानविलकर, अभिजीत जानकर, आबा पवार, प्रशांत जाधव, राहुल निंबाळकर शंकर मार्केट शिवजयंती उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते, यांच्यासह शहरातील विविध मंडळांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद रणवरे यांनी केले.