फलटण, दि. 28 : येथील दि यशवंत को-ऑप. बँक लि., फलटणची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता बँकेचे मुख्य कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, फलटण येथे बँकेचे चेअरमन ना. शेखर चरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड. धनंजय डोईफोडे यांनी दिली आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसेडिंग वाचन, दि. 31 मार्च 2019 अखेरचा वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक व नफातोटा पत्रकास मान्यता देणे, दि. 31 मार्च 2019 अखेरच्या संचालक मंडळाने सुचविलेल्या नफा वाटणीस मंजूरी देणे, बँकेच्या संचालक मंडळाने सुचविलेल्या दिर्घकालीन, व्यावसाईक आणि वार्षिक ध्येयधोरणे, विविध पॉलीसी व योजना या सर्व बाबींची नोंद घेवून त्यास मंजूरी देणे वगैरे 13 विषय वार्षिक सभेच्या विषय पत्रिकेवर ठेवण्यात आले आहेत.
वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासद यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.