महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून फलटण कोरेगावसह पश्चिम महाराष्ट्रातील बेरोजगारी दूर करणार : सौ.स्वप्नालीताई शिंदे

फलटण दि. 27 :  विविध भागात बेरोजगारीचे भीषण चित्र  दिसत असून फलटण -उत्तर कोरेगांव विधानसभा मतदारसंघासह पश्चिम महाराष्ट्रातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आपण महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन महाबळेश्वर नगर पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ . स्वप्नालीताई शिंदे यांनी केले आहे. 
येथील महाराजा मंगल कार्यालयात सिताई फौंडेशन महाबळेश्वर यांच्यावतीने फलटण शहर व तालुका आणि परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी यांच्यासाठी महारोजगार मेळावा फलटण येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर विधानसभा मतदारसंघ प्रमुख बजरंग गावडे महाबळेश्वर नगर पालिका शिक्षण सभापती कुमारशेठ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
फलटण तालुक्यातील सुरवडी येथे औद्योगिक वसाहत असूनही इथल्या तरुण तरुणी यांना नोकऱ्या नाहीत. 
मी फलटण तालुक्यातील  माहिर वाशिण असून  सिताई फौंडेशनच्या माध्यमातून फलटण येथे महारोजगार मेळावा आयोजित केला असून तरुण तरुणी यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.  सुमारे 3500  ते 4 हजार तरुण तरुणी यांनी नांव नोंदणी केली आहे. सुशिक्षित बेरोजगार यांना विविध कंपन्यामध्ये नोकरी लावण्याचा आपला प्रयत्न राहणार असून शासनाच्या विविध योजना पात्र लाभार्थी  यांच्यापर्यंत पोहोचवून उद्योग व्यवसायाच्या माध्यमातुन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा सिताई फौंडेशनचा प्रयत्न राहणार असल्याचे सौ. शिंदे यांनी सांगितले. 
मी एका सर्वसामान्य कुटुंबातुन आले आहे त्यामुळे आपणास गरीबीची  जाणीव काय असते ते माहिती आहे. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठीच सिताई फौडेशन 2/3 वर्ष झाले काम करीत आहे. 
महाबळेश्वर नगर पालिकेमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणुन आपणास काम करण्याची जनतेने संधी दिली आहे. माहेर असलेलेे फलटण तालुुुक्यातील जनतेसाठी सामाजिक काम करण्याचा आपला मानस असल्याने फौंडेशनच्या माध्यमातून काम करीत असल्याचे सौ. शिंदे यांनी सांगितले
 सिताई फौंडेशनच्या माध्यमातुन पाश्चिम महाराष्ट्रामध्ये सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक उपक्रमाबरोबरच नोकरी उद्योग व्यवसाय माध्यमातून बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. राजकारणाच्या माध्यमातुन आम्ही विविध विकासाची कामे करीत असून सामाजिक हेतूने प्रेरित होऊन फौंडेशनच्या माध्यमातून काम करीत असल्याचे महाबळेश्वर नगर पालिका शिक्षण सभापती कुमारशेठ शिंदे यांनी सांगितले. 
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचेे प्रमुख  बजरंग गावडे , संतोष पवार जिल्हाध्यक्ष विकम पावसकर यांचीही समयोचित भाषणे यावेळी झाली. 
फलटण येथील महारोजगार मेळाव्यास  शहर व तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी, बेरोजगार युवक , युवती विविध संस्थाचे पदाधिकारी , कार्यकर्त व नागरीक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. 
प्रारंभी कुमारशेठ शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत  केले. सिताई फौंडेशन पदाधिकारी यांच्यासह प्रतिनिधी यांचा मान्यवरांच्या हस्ते  यावेळी  सत्कार करण्यात आला.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!