फलटण : तामिळनाडू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना या घटनेच्या निषेधार्थ फलटण शहर व तालुक्यातील नागरिकांनी निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.
या मोर्चाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन पासून झाला. यावेळी शहर व तालुक्यातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होती.
या मोर्चासाठी सनी काकडे, शाम अहिवळे, सिद्धार्य अहिवळे, सुधीर अहिवळे (चेअरमन), हरिष काकडे, आप्पा गायकवाड, सागर सोरटे, जय रणदिवे व असंख्य भिम सैनिक उपस्थित होते.