फलटण दि. 21 : सर्वज्ञ प्रतिष्ठान द्वारा आयोजित चतुर्विध साधन वंदन व समाज प्रबोधन पदयात्रा यावर्षी सदाशिवगड (कराड) सातारा कोरेगाव व फलटण (तरडगांव) यामार्गे मंगळवार दि. 5 नोव्हेंबर ते शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार असल्याची माहिती सर्वज्ञ प्रतिष्ठान संचालक मंडळ संयोजकांनी दिली आहे.
सर्वज्ञ प्रतिष्ठान यांच्यावतीने दरवर्षी समाज प्रबोधन पदयात्रा आयोजित करण्यात येत असून हे पदयात्रेचे ३१ वे वर्ष आहे. ही पदयात्रा सातारा जिल्ह्यातील कराड सातारा कोरेगाव व फलटण तालुक्यातून जाणार आहे. पदयात्रेमध्ये २९ गावांचा समावेश असून १८ दिवस ही पदयात्रा काढली जाणार आहे. पदयात्रेमध्ये सातारा जिल्ह्यातील १३ स्थान संख्या राहणार असून २५१ प्रसाद जोडचा भाविकांना दर्शन लाभ मिळणार आहे.
सर्वज्ञ प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाज प्रबोधन पदयात्रेद्वारे महानुभाव साहित्य संशोधन संपादन व प्रकाशन केले जाते. स्थानांचे संरक्षण व जीर्णोद्धार, संस्कार वगाद्वारे मुलांचे सुसंस्कार संगोपन व परधर्मीय यांचे संरक्षण केले जाते. धमबंधू भगिनींना परधमाचे प्रशिक्षण व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
पदयात्रेचा प्रारंभ मंगळवार दि. ५ नोव्हेंबर रोजी श्रीकृष्ण मंदिर महानुभाव महिला आश्रम सदाशिवगड (वनवासमाची) ता. कराड येथून होणार आहे. पदयात्रेचा समारोप शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर रोजी महानुभाव आश्रम तरडगांव ता. फलटण येथे सकाळी ९.३० वाजता होणार असून त्यानंतर सायंकाळी ४ वाजता प्रायश्चित्त विधीने पदयात्रेचा समारोप होणार आहे.
सर्वज्ञ प्रतिष्ठान पो. माळवाडगांव ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर यांच्या माध्यमातून सर्वज्ञ विद्यापीठ सुरु असून महानुभाव साहित्य संशोधन, ग्रंथालय विभाग, हस्तलिखिते पुनरुज्जीवन, हस्तलिखिते संगोपन, महानुभाव साहित्य संपादन व प्रकाशन, एम. फिल., पीएच.डी, डि. लिट, मार्गदर्शन, पदवीपूव, पदवी, पदव्युत्तर अध्यापन, भाषा अध्यापन, संगीत, चया प्रशिक्षण, प्राणायाम, योगवग, आहारशास्त्र, निसर्गोपचार विभाग चालविले जातात.
पदयात्रा यशस्वी व्हावी यासाठी महंत श्री साधेराजबाबा कविश्वर, महंत श्री कारंजेकर बाबा महानुभाव, महंत राहेरकर बाबा महानुभाव, हंसराजदादा खामणीकर, महंत श्री चिंचोडीकर बाबा महानुभाव, भोजराजदादा अमृते, महंत श्री नांदेडकर बाबा महानुभाव व बाळासाहेब आदिक हे प्रयत्नशील आहेत.
समाज प्रबोधन पदयात्रेमध्ये भाविक भक्त संत महंत साधू तपस्विनी सदभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्वज्ञ प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.