जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त दि. 12 आक्टोंबर रोजी फलटण येथे मॅरेथॉनचे आयोजन

फलटण दि. 27 : जोशी हॉस्पिटल प्रा, लि. आणि ट्रामा सेंटर, फलटणच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त मॅरेथॉन चे आयोजन  शनिवार दि. 12 आक्टोंबर  रोजी सकाळी 6 वा.  सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथे करण्यात येत  असल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 
         दि. 12 आक्टोबर रोजी जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त जोशी हास्पिटल 5 वर्षापासून अनोख्या व आगळ्या वेगळ्या पध्दतीने हा दिन साजरा करते.  यावषी या कार्यक्रमास डॉ प्रकाश आमटे व डॉ. सौ. मंदाकिनी आमटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 
   मानवी जीवन आनंदी व समाधानी असावे त्यासाठी निरोगी मनाची आणि निरोगी मनाच्या वास्तव्यासाठी निरोगी शरीराची आवश्यकता असते शरीर निरोगी ठेवण्यात आहार व व्यायाम यांचा मुख्य वाटा असून देशाच्या जडणघडणीत युवकांचे योगदान महत्त्वाचे असल्याने युवा पिढीला समजावून घेवून त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करणे हे सामाजिक कर्तव्य असून जागतिक अस्थिरोग दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन कार्यक्रम हा त्यादृष्टीने खारीचा वाटा असल्याचे डॉ. प्रसाद जोशी यांनी स्पष्ट केले. 
          25 ते 45 वर्षे वयोगटातील सर्वाना व्यायामाचे महत्त्व समजावून देणे व  प्रबोधन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 18 वर्षापासून फलटण येथे कार्यरत असताना अस्थिरोग उपचार व सांधेरोपण शस्त्रक्रिया आणि मणक्यांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.  सदरचे पेशंट  आमच्या कुटुंबाचा एक भाग असल्याने सर्वांनी एकत्र येवून दि. 12 आक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. प्रसाद जोशी यांनी केले आहे.
दि. 12 आक्टोंबर रोजी सकाळी 6  वाजता सजाई गार्डन फलटण येथून 10 कि.मी. मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे.  सकाळी 6. 30 वाजता सजाई गार्डन येथून 5 कि. मी. मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सकाळी 7 वाजता 3 कि. मी. वाकेथान (जलद चालणे) स्पर्धा सुरू होणार आहे.
 मॅरेथॉन स्पर्धेत 20 ते 40 वयोगट यांच्यासाठी 5 ते 10 कि. मी. सळसळता युवा गट,  40 ते 60 वयोगट यांच्यासाठी 5 ते  12 कि. मी. प्रगल्भ प्रौढ गट व 60 वर्षापुढील वयोगटासाठी 2  कि. मी. जलद चालणे अनुभवी ज्येष्ठ गट असे विभाग करण्यात आले आहेत. 
सकाळी 9 वाजता सजाई गार्डन कार्यालयामध्ये सर्वांचे स्वागत व अल्पोपहार, सकाळी 10.00 वाजल्यापासून मुख्य कार्यक्रम सुरु होणार असून दुपारी 1 वाजता भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.  सजाई गार्डन  कार्यालयामधील कार्यक्रमासाठी प्रवेश पास आवश्यक असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.
मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी दि. 30 सप्टेंबर पर्यंत आनलाईन नोंदणी 200/- प्रवेश फी भरुन करता येणार असून ज्येष्ठ नागरिक यांना कोणतीही फी आकारली जाणार नाही नसल्याचे निमंत्रक डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सांगितले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!