फलटण दि. २6 : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरेचीवाडी (हिंगणगाव) ता. फलटण जि .सातारा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून दहिहंडी (गोपाळकाला) उत्सव साजरा करण्यात आला.
जन्माष्टमी निमित्त आयोजित उत्सवासाठी शेरेचीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग दर्शवत उत्साहात भिजत आणि नाचत कार्यक्रमाचा आनंद लुटला. भारतीय संस्कृतीची जोपासना करणे आवश्यक असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात येते. शेरेचीवाडी ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इ. 1 ली ते इ. 7 वीचे वग सुरु असून शाळेत 105 विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध शैक्षणिक व इतर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
विद्यार्थ्यांनी दहिहंडी फोडण्यासाठी एकावर एक थर रचून सलामी दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दहिहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर प्रसाद वाटण्यात आला.
मुख्याध्यापक कांबळे, प्रमोद निंबाळकर , मधुकर शिंदे , सुनिल बोडके , सचिन गुरव यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.