फलटण दि. २५ : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चोर्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून तालुक्यात दररोज चोर्या होत आहेत. बरड ता. फलटण येथील दुरक्षेत्राशेजारीच आज (रविवार दि. २५) पहाटे चोरटय़ांनी चोरी केल्याने पोलीस यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे.
फलटण तालुकात गेल्या काही दिवसांपासून चोर्याचे प्रमाण वाढले असून ट्रॅक्टर, स्विफ्ट कार यासह विविध जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे . बरड पोलीस दुरक्षेत्रापासून फक्त 20 फूट अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राचे दुकान फोडून चोरटय़ांनी यादुकानातील रोख रक्कम घेऊन चोरांनी पोबारा केला आहे.
बरड ता. फलटण येथील स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्रामध्ये पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी दुकानाच्या मागील बाजूने दुकानाचा पत्रा उचकटून चोरांनी दुकानात प्रवेश करुन दुकानातील काऊंटरमधील 15 ते 20 हजार रुपये रक्कम चोरीस नेली आहे. याबाबतचा गुन्हा बरड पोलीस दुरक्षेत्रात दाखल करण्यात आला आहे.
बरड येथे चोरी करताना चोरटा दुकानातील सी. सी. टिव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. चोरी करणारा युवक अंदाजे 20 ते 25 वर्षाचा असल्याचे दिसत आहे. बरड ग्रामपंचायतीच्यावतीने बरड परिसरात सी. सी. टि. व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत मात्र चोरटय़ांनी चोरी करून पोलीस यंत्रणेलाआव्हान निर्माण केले आहे.
फलटण तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून दररोज चोर्या होताना दिसत आहेत तथापी चोर्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते ह्या काय तोडगा काढतात व चोर्यांचा बंदोबस्त कसा करतात असा प्रश्न फलटण पोलीस यांच्यासमोर उभा राहिला आहे.
तालुक्यात दररोज होत असलेल्या चोरीची मालिका खंडीत होणार का ? पोलीस यंत्रणा चोरांचा बंदोबस्त करणार का ? चोर्यामुळे फलटण तालुक्यातील जनता भयमुक्त होणार का ? चोर पोलिस यांचा सूरु असलेला खेळ थांबणार तरी कधी ? असे अनेक प्रश्न फलटण तालुक्यातील जनतेला पडले आहेत. यावर पोलीस यंत्रणा काय तोडगा काढतात हे पाहणे गरजेचे आहे.