संचालक सभासद व कर्मचारी यांच्या त्रिवेणी संगमातून विजय पतसंस्थेचा नावलौकिक : धुमाळ

फलटण दि. २५ : विजय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ सभासद व कर्मचारी यांच्या त्रिवेणी संगमातून सहकारी क्षेत्रात उत्तमपणे कार्यरत असल्याने संस्थेचा नावलौकिक सातारा जिल्ह्यात वाढल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस व विजय पतसंस्थेचे संस्थापक सुभाषराव धुमाळ यांनी केले.
आदर्की बुद्रुक ता फलटण येथील विजय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री भैरवनाथ मंदिरात आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी विजय पतसंस्थेचे चेअरमन विश्वासराव धुमाळ होते. यावेळी व्हाईस चेअरमन सी. बी. पठाण संचालक शिवाजी शिंदे पंढरीनाथ नारायण धुमाळ पंढरीनाथ धुमाळ राजेंद्र पवार के. व्ही. अनपट बाबा खराडे निवास काकडे सौ. चंद्रकला विजयकुमार धुमाळ सचिव उत्तम धुमाळ यांच्यासह तानाजी धुमाळ बबनराव धुमाळ प्रल्हाद धुमाळ भानुदास जाधव बाळासाहेब भोसले विकास काकडे यांची उपस्थिती होती. 
विजय पतसंस्थेने सभासदांच्या कुटुंबातील कन्येसाठी कन्यादान योजना राबविण्यात आली असून महिलांना सबल करण्यासाठी बचतगट सुरू केले आहेत. पतसंस्थेने सभासद यांच्यासाठी अपघात विमा योजना राबविली असून सभासद यांच्या पाल्यासाठी ज्ञानदान योजना सुरु करावी व ग्रामीण विद्यार्थी यांना त्याचा लाभ पुढील उच्च शिक्षणासाठी उपलब्ध करून प्रोत्साहीत करण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा धुमाळ यांनी व्यक्त केली. 
विजय पतसंस्थेने आर्थिक कामकाज सुरुवात करुन सभासद व कर्मचारी यांच्या जोरावर आज सातारा जिल्ह्यात नावलौकिक मिळविला आहे. संस्थेकडे सध्या ३० कोटी रुपयांच्या  ठेवी असून गरजूंना २१ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. संस्थेने ९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून यावर्षी ३७ लाख ३९ हजार रुपये नफा झाला असून सभासदांना ७ टक्के लाभांश जाहीर करण्यात येणार असल्याचे चेअरमन विश्वासराव धुमाळ यांनी सांगितले. 
विजय पतसंस्थेची स्थापना १९९४ साली फलटण तालुक्याच्या पश्चिम भागातील आदर्की बुद्रुक येथे करण्यात आली. संस्थेचे सध्या ४०६५ सभासद असून सातारा जिल्हा कार्यक्षेत्र व ११ शाखा उत्तमपणे कार्यरत असल्याचे व्हाईस चेअरमन सी. बी. पठाण यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले. 
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. सचिव उत्तम धुमाळ यांनी विषय पत्रिकेवरील एक एक विषय वाचून दाखवल्यानंतर उपस्थित सभासद यांनी एकमुखाने हात वर करुन सव विषय मंजूर करण्यात आले. 
विजय पतसंस्थेच्या सातारारोड शाखेने उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल शाखाप्रमुख व सव कर्मचारी यांचा सुभाषराव धुमाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमास शिवाजीराव जाधव दशरथ जाधव मामा बनकर अरुण धुमाळ विजयकुमार धुमाळ यांच्यासह सालपे तरडगांव घाडगेवाडी वाखरी कोरेगाव सातारारोड वाठारस्टेशन बिबी फलटण व आदर्की बुद्रुक शाखेचे सभासद ठेवीदार हितचिंतक यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
शेवटी के. व्ही. अनपट यांनी आभार मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!