फलटण दि. २४ : महानुभाव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या फलटण येथील महानुभाव मंदिर, महानुभाव पंथ आणि श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही भाजपाचे माढा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने येथील श्रीकृष्ण मंदीर मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, धनजंय साळुखे पाटील, महाराष्ट्र माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ननावरे, डॉ. जे. टी. पोळ, डॉ करवा, श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प. पू. प महंत कुलाचार्य शामसुंदर विध्दांस (मोठे बाबा) ,प पू महंत सुदामराज विद्धांस, प पू महंत कापुस्तळणीकर बाबा यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण शहर व तालुक्याला अध्यात्मिक परंपरा लाभली आहे. शहरात महानुभाव, वारकरी संप्रदाय, जैन, हिंदू अन्य धर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. फलटणला ऐतिहासिक परंपरा असून ती जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. महानुभाव पंथातील विविध सामाजिक उपक्रमासाठी आपण नेहमीच सहकार्य करीत असून यापुढे सहकार्य करु असे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
प्रारंभी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वागत व सत्कार श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष महंत कुलाचार्य शामसुंदर विध्दांस यांच्या हस्ते करण्यात आला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्ण मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. सकाळ पासून मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रात्री १२ वाजता जन्मकाळ झाल्यावर भाविकांना सुंटवडा प्रसाद म्हणून देण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमी नंतर पाळणा झाला.
कार्यक्रमास श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे ट्स्टी अर्जुनराव नाळे, सदाशीव शिंदे, किसन रुस्तुम शिंदे, सिताराम शिदे फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण व त्यांचे सहकारी यांच्यासह शहर व परिसरातील भाविक भक्त उपदेशी साधू तपस्विनी नागरिक यांची उपस्थीती होती.