भररस्त्यात एकास मारहाण करून ९५ हजार घेवून चोरटयांचा पोबारा

 फलटण दि. २४ -: फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघाचे संचालक दत्तात्रय शहाजी गुंजवटे (वय ४३ रा. झिरपवाडी ता. फलटण) यांना फलटण-दहिवडी रस्त्यावर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अडवून, मारहाण करुन, गाडीतील ९५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने नेली असल्याचा गुन्हा ४ अनोळखी इसमाविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

        याबाबत शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि.२३ आगस्ट रोजी रात्री १०.५५ वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय गुंजवटे हे दुधेबावी येथे शेतकऱ्यांना दूध पेमेंट व अडव्हान्स रक्कम देऊन उर्वरित रक्कमेसह आपल्या पिकअप मधून घराकडे झिरपवाडी ता. फलटण येथे निघाले असता फलटण-दहिवडी रस्त्यावर, वर्षा ढाब्यालगत समोरुन आलेल्या इसमांनी आपली कार पीकअपला आडवी लावून थांबण्याचा इशारा केला, गाडीमधील ४ अज्ञात इसमांपैकी दोघांनी गुंजवटे यांना मारहाण केली तर इतर दोघांनी गाडीत ड्रायव्हर सीटजवळ पिशवीत ठेवलेले ९५ हजार रुपये घेऊन चौघांनी तेथून फलटण बाजूकडे पळ काढला.
     याबाबत पोलीस उपनिरीक्षक बनकर अधिक तपास करीत आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!