फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकुळ

फलटण दि.२४ : फलटण तालुक्यात यावर्षी पाऊस न पडल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला असून तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात चोरटय़ांनी मात्र धुमाकूळ घातला असून चोरांच्या त्रासाने शेतकरी यांना दुष्काळात तेरावा महिना आला आहे.

फलटण शहर व तालुक्यात येणाऱ्या गावामध्ये दररोज घरफोडी, जबरी चोरी, लुटमार, मोटार सायकल चोरी, कार चोरी, ट्रॅक्टर चोरी, मोबाईल दुकान चोरी, पान टपऱ्या चोरी, शेतकऱ्यांच्या शेतातील विहीरीवरील मोटार चोरी, गाय, शेळ्या व बोकड चोरी यासह चंदन चोरी व मराविवि कंपनीचे डिपी चोरी यामुळे तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ वैतागून गेले आहेत.
 बरड पोलीस दुरक्षेत्रात येणाऱ्या गुणवरे येथील माळशिकारे यांच्या घरी दिड ते दोन लाख रुपयांची चोरी झाली. गुणवरे व निंबळक परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी, शेळ्या व बोकड चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
 तातमगिरी घाटात दि. २० आगस्ट रोजी विवाहित जोडप्याला अडवून मारहाण करून जबरदस्तीने 6 तोळे सोने व रोख रक्कम 15 हजार रुपये , मोबाईल व इतर साहित्य असा १ लाख रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लुटला. 
पवारवाडी ता. फलटण येथील मदन पवार यांची मारुती स्विफ्ट कार चोरीला गेली. घरासमोरील कार चोरीला गेल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
राजुरी ता. फलटण येथील  पोलीस दलात नोकरी करणारे व  भारतीय सैन्य दलात देशाचे रक्षण करणारे मुले व वडील सेवानिवृत्त माजी सैनिक यांचे घरासमोरील ट्रॅक्टर चोरून पोलीस यंत्रणेसमोर चोरटय़ांनी आव्हान निर्माण केले आहे. दि.२३/८/२०१९ रोजी रात्री ११ वाजता  झिरपवाडी ता. फलटण येथील वषा ढाबा येथे  १ जणास लुटून ९५००० रुपये चोरटय़ांनी चोरून नेले आहेत.
आदर्की बुद्रुक ता फलटण येथील ग्रामीण भागातील परिसरात चंदन चोरटय़ांनी धुमाकूळ घातला आहे. रोज चंदनाची झाडे चोरटे तोडत आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे डिपी फोडून त्यातील आईल तांब्याच्या तारा चोरटे चोरुन नेत आहेत. त्यामुळे शेतकरी यांचेच नुकसान होत आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!