फलटण दि. २३ : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगांव येथील श्री ब्रम्हविद्या पाठशाळा व आश्रम संस्थेच्या वतीने गुणवत्ता विकास स्पर्धा (आनलाईन परीक्षा) आयोजित करण्यात आली होती त्याचे बक्षीस वितरण समारंभ पविते पव समर्पण सोहळा दिवशी आचार्य प्रवर प. पू. महंत राहेरकर बाबा यांच्या हस्ते संपन्न झाला.
गुणवत्ता विकास स्पर्धा सोशल नेटवर्किंग साईट माध्यमातून म्हणजे व्हाटसअपच्या 11 ग्रुपमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 700 जणांपैकी 155 सदभक्तांनी सहभागी होवून आपली गुणवत्ता तपासणी केली.
तरडगांव येथील श्री ब्रम्हविद्या पाठशाळा व आश्रम संस्थेच्या कै. तपोनिधी माई कपाटे यांच्या प्रेरणेने व संचालक प. पू. महंत व अखिल विश्व महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष प. पू. महंत राहेरकर बाबा यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा घेण्यात आली.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सदभक्तांना निळभट भांडारेकार व स्वामी श्री चक्रधर यांच्यावर आधारित आम्ही यामधील अभ्यासिका सादर करण्यात आली होती. यामध्ये 25 दिवस उपक्रम सादर करण्यात आला. जुन्या व नवीन पिढीचा समन्वय साधण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केला गेला.
गुणवत्ता विकास स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांक सौ. दिपाली श्रीकांत थोपटे (पुणे) व तुषार दिनकर इंगळे (खटाव) यांना विभागून देण्यात आला. द्वितीय क्रमांक सौ. नयना अशोक महाजन (ठाणे) व नम्रता बळवंत पवार (पाडेकरवाडी) यांना विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक सोनल निवृत्ती शेलार (ठाणे) व विनायक जगन्नाथ शिंदे (आदर्की) यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ कृष्णा तुकाराम साप्ते (ठाणे) व सौ. रुपल राकेश पाटील (लोणखेडा) यांना विभागून देण्यात आला.
प्रमाणपत्र टाफी व पं. विश्वनाथव्यास बाळापूरकर महानुभाव विचरित ज्ञानप्रबोधन पुस्तक देवून विजेत्या स्पर्धकांना प. पू. महंत राहेरकर बाबा यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तरडगांव येथील श्री ब्रम्हविद्या पाठशाळा व आश्रम येथील श्रीकृष्ण मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यावेळी मंदिरासमोर निसर्गरम्य देखावा उभा करण्यात आला होता. भाविक भक्त महिला तरुणींनी मंदिरात रांगोळी काढली होती. रांगोळी काढणार्या तरुणी व महिलांचा सत्कार करण्यात आला. ब्रम्हविद्या पाठशाळा व आश्रम संस्थेमध्ये रांगोळी पाककला भजन पूजन यासारख्या २० स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.
गुणवत्ता विकास स्पर्धेसाठी सुरेशराज बापू राहेरकर गोपाळदादा व प्रमोद दादा राहेरकर यांच्यासह आश्रम संस्थेतील महंत भाविक व भक्त यांनी परिश्रम घेतले.