फलटण : मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,फलटणमधील इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभात प्राचार्य हंकारे सर बोलत होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राचार्यांनी मदर तेरेसा यांचे उदाहरण देऊन सांगीतले की, जर एखादी मुलगी दुसऱ्या देशातून येऊन आपल्या देशात यशस्वी होत असेल एवढे महान कार्य करू शकत असेल तर आपण आपल्या कार्यात का यशस्वी होऊ शकत नाही याचा सर्व विद्यार्थ्यांनी विचार करण्याचे आव्हान प्राचार्यांनी केले.
तसेच ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे उदाहरण देऊन आयुष्यात ध्येय असेल तर कोणत्याही अडचणीवर मात करून यशस्वी होता येतं हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. यासाठी विद्यार्थींनी ध्येय निश्चित करून योग्य आदर्श डोळ्यासमोर ठेवून ते मिळविण्यासाठी अतोनात कष्ट करण्याची तयारी विद्यार्थींनी ठेवण्याचे आवाहन प्राचार्यांनी केले.
यावेळी महेश पाटील यांनी यशस्वी होण्यात आई वडील , शिक्षक, मार्गदर्शक यांचा 10 टक्के वाटा असतो तर सिंहाचा वाटा हा त्या विद्यार्थ्यांचा असल्याचे सांगितले.
यावेळी पाहुण्यांचा परिचय वेदपाठक सर यांनी करून दिला , तसेच स्कूल कमिटी चेअरमन आर.व्ही. निंबाळकर, राऊत सर, शिंदे सर , कदम मँडम व विद्यार्थ्यांनी इ. आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाला आ.र.व्ही निंबाळकर, गरवालीया साहेब, प्राचार्य हंकारे सर, उपप्राचार्य शिंदे सर, मा. उपप्राचार्य राऊत सर, पाटील सर , पत्रकार मोरे सर, मोहीते सर , सर्व प्राध्यापक व 12वी.चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.