फलटण : राज्यातील शेतकऱ्यांची चेष्टा या सरकारने चालवली आहे. मंत्रिमंडळात शेतकऱ्यांचा वाली कोण नसल्याने ही हालत झाली आहे.कोण आहे तिथे सत्तेत फडवणीस, मुनंगटीवार, बापट हे शेतकरी आहेत का? दिसतात का तरी? हे जाण नसलेले सत्तेत बसले असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. ही काय अवस्था आहे? 302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचा फडवणीस उत्तर द्या असा संतप्त सवाल विधिमंडळ पक्षनेते अजित दादा पवार यांनी फलटणच्या जाहीर सभेत केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या तिसर्या टप्प्याचा दुसर्या दिवसातील दुसरी सभा फलटण येथे प्रचंड गर्दीत पार पडली. त्यावेळी आ. अजित दादा पवार बोलते यावेळी प्रदेशाध्यक्ष आ.जयवंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे रघुनाथराजे नाईक-निंबाळकर जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर,
फलटण, माण, खटाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते