फलटण : फलटण नगरपरिषद, फलटण विविध विषय समिती सभापती, उपसभापती पदग्रहण कार्यक्रम उत्साहात संपन्न…फलटण : फलटण नगरपरिषद, फलटण विविध विषय समिती सभापती, उपसभापती व सदस्य निवडी नुकत्याच बिनविरोध पार पडल्या होत्या. या नवनिर्वाचित समिती सभापती, उपसभापती पदग्रहण समारंभ मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा यांच्या शुभहस्ते फलटण नगरपरिषद, फलटण कार्यालयात संपन्न झाला. सर्व विषय समित्यांच्या सभापती, उपसभापती पदभार देताना मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), सदस्य, स्थायी समिती, मा.श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब), सदस्या, स्थायी समिती, नगराध्यक्षा मा.सौ.निता मिलिंद नेवसे, स्थायी समिती (पदसिध्द) आणि उपनगराध्यक्ष मा.श्री.नंदकुमार आबाजी भोईटे, नियोजन व विकास समिती (पदसिध्द) सभापती असून मा.अॅड.सौ.मधुबाला दिलीपसिंह भोसले, सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती, मा.सौ.ज्योत्स्ना अनिल शिरतोडे, सभापती, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती, मा.श्री.अजय दत्तात्रय माळवे, सभापती, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक, मा.श्री.असिफ अब्दुल तथा बाळासाहेब मेटकरी, सभापती, शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती, मा.सौ.सुवर्णा अमरसिंह खानविलकर, सभापती, महिला व बालकल्याण समिती व मा.सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, उपसभापती, महिला व बालकल्याण समिती, इत्यादी पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मा.श्रीमती रंजना जगन्नाथ कुंभार यांचा नगरसेविकापदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला, यावेळी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी व सेवक वर्ग उपस्थित होते.