फलटण : मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या संकल्पनेतून श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान, फलटण यांच्या वतीने “राजमाता जिजाऊ माँसाहेब,” यांच्या ४२१ व्या जंयती निमित्त शनिवार दिनांक १२ जानेवारी २०१९ रोजी सायं ७ वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई महाराज, श्रीमंत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीने पावन झालेल्या ऐतिहासिक मुधोजी मनमोहन राजवाडा, फलटण येथे मा.श्री.विश्वजीत तावरे लिखित “साक्षात जिजाऊ,” सादरकर्त्या – मा.सौ.गौरी थोरात (संगमनेर) व “शिवसिंहाचा छावा – शंभूराजे,” सादरकर्ते – मा.श्री.वैभव चव्हाण (बारामती) यांनी एकपात्री नाट्यप्रयोग सादर केले. या कार्यक्रमास मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब, प्रसिद्ध शिवचरित्र अभ्यासक मा.श्रीमंत कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण, मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा, मा.श्रीमंत सौ.शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर (वहिणीसाहेब), सदस्या, जिल्हा परिषद, सातारा, मा.सौ.निताताई मिलिंद नेवसे, नगराध्यक्षा, फलटण नगरपरिषद, फलटण, मा.प्राचार्य विश्वासराव देशमुख, मा.श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सदस्य, पंचायत समिती, फलटण, मा.श्रीमंत अजयसिंहराजे संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान पदाधिकारी, विविध संस्था पदाधिकारी, अधिकारी, महिला, पत्रकार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन मा.प्रा.डाॅ.अशोक शिंदे यांनी केले. आयोजक : श्रीमंत मालोजीराजे स्मृती महोत्सव समिती, फलटण.