आसू वार्ताहर : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर फलटण एज्युकेशन सोसायटीचे राष्ट्रीय सेवा योजनेचया इंदिरा गांधी प्रथम राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुधोजी महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त विदयमाने ग्रामीण विकास या घोष वाकया खाली राष्ट्रीय सेवा योजना सुवर्ण महोत्सवी वर्षानीमितत मुधोजी महाविद्यालयाचे पवारवाडी येथे विशेष श्रमसंसकार शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन संयोजक प्राध्यापक सतिश पवार यांनी केले
पवारवाडी आसू येयेथे सोमवार दि 7जानेवारी ते रविवार दि 13जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना मुधोजी महाविद्यालय फलटण व ग्रामपंचायत पवारवाडी यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित केले आहे या शिबिराचे उदघाटन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी व जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहसते या शिबिराचे उदघाटन होणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा बॅक सातारा संचालक श्रीमंत दादाराजे खर्डेकर असून प्रमुख पाहुणे म्हणुन पंचायत समिति उपसभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर महादेवराव पवार बाळासाहेब परकाळे दिलीप गावडे शिवाजीराव पवार प्राचार्य डॉ सुधिर इंगळे सरपंच ज्ञानेश्वर पवार अनिल जाधव यांच्या सह या भागातील नागरिक उपस्थित राहणार आहेत
या शिबिरामधये सांस्कृतिक कार्यक्रम भारूड आरोग्य शिबीर व्याख्यान व विविध उपक्रम अशी कार्यक्रमांची रेलचेल आहे या कार्यक्रमाचा लाभ सर्वानी घ्यावा असे अवाहन करणयात आले आहे
या शिबिराचा समरोप रविवारी होणार असून त्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिति चे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आमदार दिपक चव्हाण सभापती प्रतिभा धुमाळ प्राचार्य विश्वासराव देशमुख अरविंद निकम श्रीकांत फडतरे सरपंच ज्ञानेश्वर पवार अनिल जाधव आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत