बारामती : वाईट सवयीचे व्यसन न करता त्याऐवजी खेळाचे व्यसन करा त्यामुळे त्या खेळातील विजेतेपदक सहज मिळवाल व देशाचे नाव ऊजवल कराल असा सल्ला बारामती कराटे असोसिएशन व शरयु फौंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी कराटे खेळाडूंना दिला.बारामती कराटे असोसिएशन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद पुणे , राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कराटे स्पर्धांचा उदघाटन प्रसंगी शर्मिला पवार बोलत होत्या.या वेळी प्रांताधिकारी हेमंत निकम,तहसीलदार हनुमंत पाटील,श्रीनिवास वाईकर,दादा आव्हाड,तांत्रिक व तक्रार निवारण सदस्य संदीप गाडे,परमजीत सिंग,अनिल पाटील,संदीप वाघचोरे,मिनानाथ भोकरे,कैलास पाटील,सल्लाउद्दिन अन्सारी आदी मान्यवर उपस्तीत होते. जिद्द,चिकाटी व आत्मीश्वास च्या जोरावर खेळाडूंनी यश मिळवावे तालुका,जिल्हा,राज्य ,राष्ट्रीय स्पर्धा व परदेशात सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून देशाचे नाव ऊजवल करावे असे सांगून प्रेरणादायी मार्गदर्शन खेळाडूंना शर्मिला पवार यांनी केले.शासनाच्या वतीने सर्व खेळाचे सामने व्हावेत व त्यांना सराव करता यावा या साठी नेहमीच शासन सहकार्य करत असल्याचे तालुका क्रीडा अधिकारी राजेशकुमार बागुल यांनी सांगितले. विद्यार्थी दशेत खूप सराव करा हा सराव जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मदत करेल असे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी सांगितले.सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले. या प्रसंगी विविध स्पर्धे मधील यशस्वी विद्यार्थ्यां चा सन्मान करण्यात आला.आभार प्रदर्शन बारामती कराटे असोसिएशन चे मुख्य प्रशिक्षक रवींद्र कराळे यांनी केले.राज्यातून 700 स्पर्धक व 105 प्रशिक्षक यांनी उपस्तीती दर्शवली.