फलटण(प्रतिनिधि)– राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या ठिकाणी मिळालेल्या काँग्रेस पक्षाला घवघवीत यशा बद्दल व काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांचे अभिनंदन करण्यासाठी फलटणमध्ये काँग्रेस पक्षांच्या वतीने साखर वाटून व फटाके वाजवून आनंद जल्लोष साजरा करण्यात आला
आज जसजसे 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल बाहेर येऊ लागले तसतसे काँग्रेस कार्यकर्ते बाहेर येऊन जल्लोष करू लागले फलटण शहरात चौकाचौकात आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य जयकुमार शिंदे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम शिंदे,शहराध्यक्ष आणि नगरसेवक अशोकराव जाधव,नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर , नगरसेवक सचिन बेडके,सचिन अहिवळे, महेंद्र बेडके, अशोकराव भोसले काँग्रेसच्या सर्व नगरसेविका, पक्षाचे सर्व पदाधिकारी,नगरसेवक व कार्यकर्ते यांनी साखर,पेढ़े वाटून फटाके वाजवून जल्लोष केला