फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे अभ्यास केंद्राची झंझावाती सुरूवात

फलटण : मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, फलटण मार्फत राबविण्यात येत असलेल्या श्रीमंत मालोजीराजे अभ्यास केंद्रामार्फत CET, NEET,JEE & AIEEA या परिक्षेचे मार्गदर्शन करण्यात येते .या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात , या उपक्रमाअंतर्गत फलटण तालुक्यातील सायन्स विषय शिकविणाय्रा शिक्षकांचे शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दि.6 व 7 डिसेंबरला   अॅग्री कॉलेज, फलटण येथे करण्यात आले होते .
          या कार्यशाळेचे उदघाटन मा. आमदार दिपकरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले, कार्यशाळेला सायन्सचे शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य हंकारे सर यांनी श्रीमंत मालोजीराजे अभ्यास केंद्राची सुरूवात करण्याची गरज का निर्माण झाली या बद्दल माहिती दिली.
       यावेळी बोलताना प्राचार्य म्हणाले की, ग्रामीण भागातील गरजू , गरीब व होतकरू विद्यार्थ्याला अश्या प्रकारच्या अभ्यासकेंद्राची जवळपास सोय नव्हती, जी अभ्यास केंद्रे होती ती लांब व त्यांची फी गरीब विद्यार्थ्यांना न परवडणारी तसेच शिकविण्याची पद्धत ग्रामीण व सामान्य विद्यार्थ्यांना न समजणारी होती .
         या सर्व समस्यांचा विचार करून त्यावर मार्ग काढण्यासाठी फ.एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे मार्गदर्शन घेऊन ज्येष्ठ शिक्षकांशी विचार विनीमय करून, सर्व प्राध्यापकांच्या सहकार्याने श्रीमंत मालोजीराजे अभ्यास केंद्र सुरू केल्याचे प्राचार्यांनी सांगितले.
          तसेच फलटणबाहेर न जाताही , वेगळे ग्रंथालय, सर्व प्रकारची पुस्तके, गेस्ट लेक्चरची सोय , विद्यार्थ्यांना
शिकवण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक विषयाच्या 8 ते 10 शिक्षक उपलब्ध असल्यामुळे  विद्यार्थी व पालकांचा कल या अभ्यास केंद्राकडे वाढत असल्याचे यावेळी बोलताना प्राचार्यांनी सांगितले.
        या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे MBD ग्रुपचे,श्री.  श्रीवास्तव दिनेश यांनी MBD  ग्रुप करत असलेल्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला.
           या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार दिपकरावजी चव्हाण 
यांनी विद्यार्थींची गरज ओळखून मालोजीराजे अभ्यास केंद्र सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांची सोय केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार चव्हाणसाहेबांनी केले .
              या कार्यक्रमाला आमदार दिपकरावजी चव्हाण, स्कूल कमिटी चेअरमन आर. व्ही. निंबाळकर, व्हाईस चेअरमन गरवालीया साहेब, सदस्य शरद राव रणनवरेसाहेब, प्रशासन अधिकारी निकमसर, MBD ग्रुपचे सर्व सदस्य, प्राचार्य हंकारे सर , प्राचार्य डॉ. निंबाळकर सर , प्राचार्य डॉ. शिंदे सर , पर्यवेक्षक नाळेसर व विविध काॅलेजमधील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशीद मँडम व कदम मँडम यांनी केले , आभार उपप्राचार्य राऊत सर यांनी मानले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!