फलटण : स्वच्छ सर्वेक्षण – २०१९ अंतर्गत फलटण शहरातील प्रभाग.क्.१० मध्ये लोकसहभागातून सोमवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.दगडी पूल येथे सदरच्या अभियानाचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्षा सौ.निताताई मिलिंद नेवसे नगरसेवक अजय माळवे नगरसेविका सुवर्णाताई खानविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी फलटण शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष मिलिंद राजाराम नेवसे अमरसिंह खानविलकर मुधोजी कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच
प्रभाग क्र.१० मधील नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.