फलटण : स्वच्छ सर्वेक्षण – २०१९ अंतर्गत फलटण मध्ये लोकसहभागातून सोमवार दिनांक ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदरच्या अभियानाचा प्रारंभ मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभापती विधानसभा महाराष्ट्र राज्य, आमदार मा.श्री.दिपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जि.प.सदस्य मा.श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्षा सौ.निताताई मिलिंद नेवसे आरोग्य सभापती सौ.वैशालाताई सुधीर अहिवळेे, सौ.प्रगतीताई जगन्नाथ कापसे नगरसेविका, मा.किशोरसिंह नाईक निंबाळकर नगरसेवक, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी फ.न.प. नगरसेवक, नगरसेविका, फलटण शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष मिलिंद राजाराम नेवसे फ.न.प. कर्मचारी, मुधोजी कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.