फलटण ( प्रतिनिधी ) फसव्या घोषणा करुन जनतेला खाईत ढकलणाऱ्या मोदी व फङवणीस सरकारने पायउतार व्हावे असे प्रतिपादन आमदार दिपकराव चव्हाण यांनी केले. सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे, खो गये, खो गये, अच्छे दिन खो गये, अशा घोषणाबाजी करत आ. दिपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.मोर्चा तहसिलदार कार्यालया जवळ आल्यावर आ. दिपकराव चव्हाण बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे पंचायत समितीच्या सभापती प्रतिभाताई धुमाळ, पंचायत समितीचे उपसभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्ङेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.तहसिलदार विजय पाटील यांनी निवेदन स्विकारले.
महात्मा गांधी यांना अभिवादन करून गजानन चौकातून मोर्चाला सुरुवात झाली.
केंद्र व राज्य सरकारने फक्त फसव्या घोषणा करत असून सर्वसामान्य लोकांना महागाई ची झळ पोहोचत आहे. यामुळे शेतकरी, कामगार तसेच महिला वर्ग यांचे बजेट कोलमडून पडले असताना फक्त फसव्या घोषणा देण्यात मग्न आहे. केलेल्या घोषणा पूर्ण करण्यासाठी नसतातच असे त्यांचेच मंत्री सांगत असल्यामुळे या केंद्र व राज्य सरकार ला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. मोदी व फडणवीस सरकारने पाय उतार व्हावे, असे आमदार दीपक चव्हाण म्हणाले .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विलासराव नलावडे, युवकांचे अध्यक्ष जयकुमार इंगळे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ङॉ . बाळासाहेब शेंडे, नगरसेवक अजय माळवे, विक्रम जाधव रेश्माताई भोसले, भिमदेव बुरुंगले, सुधीर अहिवळे, नगरसेविका वैशालीताई चोरमले, प्रगतीताई कापसे, ज्योत्स्ना शिरतोडे, दिपाली निंबाळकर नगरसेविका जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.