फलटण : सातारा-पुणे मार्गावर शिरवळजवळ कारला अपघात झाल्याने फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जगन्नाथ कुंभार आणि जिल्हा खो-खो असोसिएशनचे कार्याध्यक्ष पी. जी. शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.
माजी नगराध्यक्ष अशोकराव आनंदराव देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरच्या अपघाताने फलटण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील दोन दिवसांत तालुक्यातील पाच जणांचा अपघाती मृत्यू झाल्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.