फलटण : शंकर मार्केट दहिहंडी उत्सव मंडळ व राजे ग्रुप, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही दहिहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील दहिहंडी फोडण्याचा मान तासगाव (जि.सांगली) चे उपनगराध्यक्ष दिग्वीजय पाटील यांच्या बॉक्सर ग्रुप गोविंदा पथकाने मिळवला.
सदर स्पर्धेचा शुभारंभ सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व फलटण पंचायत समितीचे सदस्य श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी फलटण पंचायत समितीच्या सभापती सौ.रेश्माताई भोसले, माजी नगराध्यक्ष नानासाहेब नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ.प्रगतीताई कापसे, सौ.दिपाली निंबाळकर, सौ.भारती नाईक निंबाळकर, सौ.अमृता नाईक निंबाळकर, नगरसेवक आसिफ मेटकरी, विक्रम जाधव, तेजसिंह भोसले, अमरसिंह खानविलकर, दादासोा चोरमले, सुधीर अहिवळे, प्रविण भोसले-पाटील, किशोर देशपांडे, रामभाऊ पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेमध्ये तासगाव (जि.सांगली)च्या बॉक्सर ग्रुप गोविंदा पथकाने सहा थर रचून दहिहंडी फोडण्याचा मान मिळवला. त्यांना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते रोख पारितोषिक व चषक बक्षीस देण्यात आले. प्रारंभी प्रमुख पाहुणे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागत नानासाहेब नाईक निंबाळकर यांनी तर श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागत किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.
सदर दहिहंडी स्पर्धेचे यशस्वी आयोजन मंडळाचे अध्यक्ष, नगरसेवक किशोरसिंह (भैय्या) नाईक निंबाळकर, अभिजित निंबाळकर, अजहर शेख, अमोल नाळे, महेश सुतार, गणेश देशपांडे, अनिल वेलणकर, रोहित पाटणे, सैफुल्ला शेख, संतोष कर्वे, सुजित कापसे, बबलु पवार, मयुर हिरणवाळे, किरण निंबाळकर, संतोष हिरणवाळे, अथर्व ढवळीकर, योगेश हिरणवाळे, गणेश महामुनी, दिनेश कर्वे, विश्वराज गांधी, नंतजीत हिरणवाळे, राघव देशपांडे, अक्षय कर्वे, गणेश कर्वे, अशुतोष केेंजळे, हर्षद सोनवणे, गोटू शिंदे, हरीष कर्वे, ऋषिकेश कर्वे, पंकज जांभळकर, वरद घाडगे, ओंकार देशपांडे, तुषार देशपांडे, दिलीप चवंडके, यांनी केले.
यावेळी भाऊसोा कापसे, बाळासाहेब फुले, महादेव माने, सचिन तिवाटणे, जहांगीर आतार, सुनिल जंगम, नितीन तारळकर, जयंत सहस्त्रबुद्धे, बापू हिरणवाळे, आबा पवार, प्रशांत जाधव, शिवराज नाईक निंबाळकर, तुषार नाईक निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर, राहुल निंबाळकर शंकर मार्केट शिवजयंती उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते, यांच्यासह शहरातील विविध मंडळांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या
संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ कोलवडकर यांनी केले.