निंबळक येथे घर उपयोगी पुरातन व आधुनिक वस्तू चे प्रदर्शन संपन्न 

राजुरी: फलटण तालुक्यातील निंबळक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पुरातन काळातील घर उपयोगी साहित्याचे प्रदर्शन संपन्न झाले आहे. 
पुरातन काळात  पारंपरिक पद्धतीने वापरत असलेल्या वस्तू व आधुनिक काळात या वस्तूच्या वापरात झालेला बदल या विषयी विद्यार्थींना ज्ञान मिळावे या उद्देशाने फलटण तालुक्यातील निंबळक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पुरातन काळापासून आज अखेर पर्यंत वापरात येणाऱ्या घर उपयोगी वस्तूचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या मध्ये मसाला बारीक करण्यासाठी लागणारा पाटा -  वरवंटा, मुसळ, दळण दळण्यासाठी वापरले जाणारे जाते , भाकरी करण्यासाठी वापरली जाणारी लाकडी परात ,  सुप, पितळी भांडी, मातीची भांडी, अॅल्यूमिनियमची भांडी याच्यासह सध्याच्या काळात वापरात येणारी स्टील व प्लास्टीक भांडी अशा सुमारे एक हजार भांड्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश म्हणजे शाळकरी मुलांना या पुरातन वस्तूचे ज्ञान मिळणे व आधुनिक युगात माणसाने केलेली प्रगती हा होता. या वेळी या प्रदर्शनास निंबळक गावच्या सरपंच सौ. संगीता निंबाळकर, पोलीस पाटील समाधान कळसकर , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जयराम मोरे , शाळेचे मुख्याध्यापक जंगम , ग्रामस्थ , शिक्षक व विद्यार्थी आदींसह मान्यवर मंडळींनी प्रदर्शनास भेट देऊन कौतुक केले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!