फेडरेशन वीक विविध कार्यक्रम आणि उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा

फलटण, दि. 22 : जैन सोशल ग्रुप फलटण सिटीच्यावतीने जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या मार्गदर्शक सूचनानुसार दि. 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान फेडरेशन वीक विविध कार्यक्रम आणि उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजनचे चेअरमन मांगीलालजी कोठारी, सातारा यांचे याकामी मोलाचे मार्गदर्शन झाले. 
फेडरेशनच्या मार्गदर्शक सूचनानुसार रविवार दि. 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता श्री शांतीनाथ जैन श्‍वेतांबर मंदिर उपाश्रय फलटण येथे ध्वजारोहणाने फेडरेशन वीकचा शुभारंभ करण्यात आला सोमवार दि. 13 ऑगस्ट रोजी पाचपांडव आश्रम शाळा अलगुडेवाडी ता. फलटण येथे सुमारे 300 विद्यार्थी/विद्यार्थीनींना दुपारचे भोजन आणि मिष्ठान्न देण्यात आले. मंगळवार दि. 14 ऑगस्ट रोजी श्री शांतीनाथ जैन श्‍वेतांबर मंदिर उपाश्रय येथे उपजिल्हा रुग्णालय फलटण आणि जैन सोशल ग्रुप फलटण सिटीच्या संयुक्त सहभागाने महानुभाव पंथीय आणि अन्य समाज बांधव स्त्री/पुरुषांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबीर संपन्न झाले. सुमारे 125 रुग्णांनी त्याचा लाभ घेतला. उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुभाष गायकवाड यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी श्री शांतीनाथ जैन श्‍वेतांबर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिपक मेहता होते. यावेळी डॉ. भागवत, डॉ. तारळकर, डॉ. चव्हाण मॅडम यांनी रुग्णांची तपासणी केली. बुधवार दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर राष्ट्रध्वजारोहण व राष्ट्रध्वज वंदन जैन सोशल ग्रुप फलटण सिटीचे अध्यक्ष अरविंद मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर बाजार समितीच्या सभागृहात बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते बाजार समितीमधील सुमारे 170 हमाल यांना टॉवेल, टोपी, गुलाबपुष्प देवून तर सुमारे 20 मापाडी यांना कॅल्क्युलेटर भेट देवून जैन सोशल ग्रुप फलटण सिटीच्यावतीने श्रमीकांचा अनोखा सन्मान करण्यात आला. यावेळी फलटण तालुका जनरल कामगार युनियनचे सेक्रेटरी एम.पी.भगत, संघटनेचे अध्यक्ष धनराज निंबाळकर, बाजार समितीचे संचालक प्रकाश भोंगळे, मोहनराव निंबाळकर, परशूराम फरांदे, संजय कदम, बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर, जैन सोशल ग्रुप फलटण सिटीचे पदाधिकारी, सभासद, उपस्थित होते. गुरुवार दि. 16 ऑगस्ट रोजी शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होवून वनविभागाच्या फलटण येथील वनक्षेत्रावर जैन सोशल ग्रुप फलटण सिटीच्या सदस्यांच्या हस्ते सपत्नीक मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी फलटणचे वनक्षेत्रपाळ घाडगे उपस्थित होते. 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!