फलटण : महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) वार्षिक सभा बुधवार, दिनांक 29 ऑगस्ट 2018 रोजी सायं.4 वा. पुणे येथील मसाप माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड येथे मसापचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केल्याची माहिती सभेचे निमंत्रक व मसाप पुणे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या महत्त्वपूर्ण सभेसाठी मसाप विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ.शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त, माजी आमदार उल्हासदादा पवार, विश्वस्त यशवंतराव गडाख, कार्याध्यक्ष प्रा.मिलींद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सदस्य विनोद कुलकर्णी, मसाप पत्रिका संपादक डॉ.पुरुषोत्तम काळे, मसाप सर्व कार्यवाह, कार्यकारी मंडळ सदस्य, मसाप जिल्हा प्रतिनिधी उपस्थिती राहणार आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा जिल्ह्यातील सर्व मसाप शाखांचे अध्यक्ष व पदाधिकारी, आजीव सभासद यांनीही या सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन, मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ व डॉ.सोपानराव चव्हाण यांनी केले आहे.