लेखक, कवी, नाटककार, चित्रकार, व्यंगचित्रकार, पत्रकार हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे घटक : कवी हणुमंत चांदगुडे

फलटण : वाचनाने माणूस घडतो. त्याला व्यक्त होण्यासाठी संधीची आवश्यकता असते. लेखक, कवी, नाटककार, चित्रकार, व्यंगचित्रकार, पत्रकार हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे घटक आहेत. यापैकी कवी हा चिंतनशील व कमी शब्दात जास्त आशय मांडणारा व समाजाचे संवेदनशील मन जागृत करणारा महत्त्वाचा घटक आहे, असे मत प्रसिद्ध कवी हणुमंत चांदगुडे यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांच्या संकल्पनेतून नुकताच म.सा.प.फलटण शाखेच्यावतीने धुळदेव, ता.फलटण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमानशेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालयात ‘ पाठ्यपुस्तकातील कवी आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी कवी हणुमंत चांदगुडे बोलत होते. यावेळी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक सौ.एम.डी.जाधव, मसाप फलटण शाखेचे कार्याध्यक्ष प्रा.रविंद्र कोकरे, ज्येष्ठ सदस्य महादेव गुंजवटे, पत्रकार निलेश सोनवलकर, कवी ताराचंद्र आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

हणुमंत चांदगुडे पुढे म्हणाले, माझी ‘आळशी’ ही कविता इयत्ता 8 वी च्या पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमात आली हे ग्रामीण साहित्यिकांचे प्रातिनिधीक स्वरुप आहे. ‘आळशी’ कविता जीवन जगायला शिकवते. त्यामध्ये शेतकर्‍याचे प्रतिबिंब आहे.

कवी ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविकामध्ये कविता कशी सूचते, तिची मांडणी कशी असावी, कवीतेचे विविध पैलू उलघडणे, कविता वाचन, गायन यावर मत मांडून विद्यालयामध्ये कवी आपल्या भेटीला हा उपक्रम गेली 5 वर्षे सुरु असून विविध कवींना भेटीसाठी आमंत्रित केले जाते असे सांगीतले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालकवी सुयश आवळे व समर्थ पोतदार यांनी केले तर आभार अनिकेत कारंडे यांनी मानले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी विठ्ठल निकाळजे, राजेंद्र शिर्के, बाबासाहेब जगताप, ए.पी.गाडे, एस.एल.लव्हाटे, एस.टी.राऊत, वर्धमान गायकवाड, एम.डी.जाधव व विद्यार्थी उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ताराचंद्र आवळे व विद्यालयातील इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. 

दरम्यान, यानंतर फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत मालोजीराजे शेती महाविद्यालयातही मसापच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवी हणुमंत चांदगुडे यांना या ठिकाणीही विद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

——————– ——————– ——————– ——————– ——————–

धुळदेव, ता.फलटण येथील श्रीमानशेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत कवी हणुमंत चांदगुडे. समवेत महादेव गुंजवटे, प्रा.रविंद्र कोकरे, ताराचंद्र आवळे, निलेश सोनवलकर. 

Share a post

0 thoughts on “लेखक, कवी, नाटककार, चित्रकार, व्यंगचित्रकार, पत्रकार हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे घटक : कवी हणुमंत चांदगुडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!