फलटण – जंतरमंतर दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या प्रती जाळुन आंबेडकर मुर्दाबादच्या घोषणा दिल्याच्या निषेधार्थ आज फलटण येथे संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाची सुरुवात येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन,मंगळवार पेठ येथुन हा मोर्चा जुनी चावडी – पंचशील चौक – बारामती चौक – नाना पाटील चौक – छञपती शिवाजी महाराज चौक – डॉ.आंबेडकर चौक – महावीर स्तंभ – उमाजी नाईक चौक – गजानन चौक – महात्मा फुले चौक मार्गे तहसिल कार्यालयावर धडकला.
तहसिल कार्यालयावर मोर्चा पोहचल्यावर प्रथम संविधान प्रतिज्ञा वाचुन सुरुवात करण्यात आली.तसेच लहान मुलींनी इंग्रजी मध्ये संविधान प्रतिज्ञेचे वाचन केले.
यावेळी बोलताना अशोक गायकवाड म्हणाले,डॉ.आंबेडकर यांनी लिहलेले संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि अशा संविधानाच्या प्रती जाळुन असे मनुवादी कृत्य करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई केली नाही तर येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.ते पुढे म्हणाले,येणारा काळ हा खुप गंभीर असुन या काळास सामौर्य जाण्यासाठी समक्षपणे उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले.
बसपाचे महाराष्ट्र सचिव काळुराम चौधरी म्हणाले,संविधानाची प्रत जाळणारे हे एका बापाची औलाद नाही.ज्या बाबासाहेबांनी अहोराञ कष्ट घेऊन संविधान तयार केले असे ही संविधान जाळणार्या मनुवाद्यांना गाडल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.पुढे ते म्हणाले की,संविधान हे फक्त महार,बौध्द समाजासाठीच नसुन सर्व भारतीयांसाठी आहे असे जाणिव देखील इतर समाजाला त्यांनी करुन दिली.येणाऱ्या काळात जर हे बीजेपी चे सरकार जमिनीत गाडले नाही तर असे जातीवादी कृत्य हे घडतच राहणार असे मत व्यक्त केले.यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करुन संविधान जाळणार्यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने तहसिलदार विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले.या मोर्चामध्ये संविधान चिरायु होवो,संविधान जाळणार्यांचा धिक्कार असो,भिडे गुरुजी मुर्दाबाद,एकच साहेब बाबासाहेब,संविधान जाळणार्या मनुवाद्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या.
फलटण शहरात शांततेत मोर्चा काढण्यात आला.या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्ग सहभागी झाल्या होत्या.फलटण शहर हे चळवळीचे ठिकाण असुन फलटण शहरात मोठ्या प्रमाणात बौध्द समाज आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्याच्या वतीने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती.