फलटण येथे पारंपारिक नागपंचमी उत्सव उत्साहात साजरा

फलटण : फलटण नगर परिषद, फलटण, शनिनगर मित्र मंडळ, फलटण व योद्धा ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने  “पारंपारिक नागपंचमी उत्सव,” (जल्लोष फक्त महिलांकरिता) कार्यक्रमास मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा, नगराध्यक्षा मा.सौ.निताताई मिलिंद नेवसे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मा.श्री.मिलिंद राजाराम नेवसे (आप्पा), राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष मा.श्री.जयकुमार इंगळे, पोलीस निरिक्षक मा.श्री.प्रकाश सावंत, नगरसेवक मा.श्री.किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर (भैया), नगरसेविका मा.सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, नगरसेविका मा.सौ.ज्योत्सनाताई अनिल शिरतोडे, नगरसेविका मा.सौ.सुवर्णाताई अमरसिंह खानविलकर, नगरसेविका मा.सौ.दिपालीताई शैलेश निंबाळकर, नगरसेविका मा.सौ.वैशालीताई दादासाहेब चोरमले, नगरसेविका मा.सौ.ज्योतीताई अरुण खरात, नगरसेविका मा.सौ.मदलसाताई संभाजी कुंभार, मा.श्री.सुनिल गायकवाड (PSI), मा.देसाई मॅडम (PSI), मा.श्री.काळे मॅडम (PSI), हणमंतवाडी सरपंच मा.श्री.विक्रमसिंह जाधव, मा.श्री.महादेव साहेबराव माने, मा.श्री.दादासाहेब महानवर इत्यादी मान्यवर उपस्थित होते, यावेळी श्री नागोबा देवतेची विधिवत पूजा मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) व नगराध्यक्षा मा.सौ.निताताई  मिलिंद नेवसे यांच्या शुभहस्ते करण्यात आली, या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी “पैठणी” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ड्रॉ पध्दतीने सहभागी महिला मधून १० चिठ्या काढून नंतर संगीत खुर्ची स्पर्धा घेऊन पहिले तीन क्रमांक काढण्यात आले, यामध्ये प्रथम क्रमांक सौ.बुरुंगले, द्वितीय क्रमांक सौ.चव्हाण, तृतीय क्रमांक सौ.गेवरे यांनी मिळविले, कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वश्री अभिजीत जानकर, वैभव जानकर, संकेत पवार, गोरख पवार, निलेश शिंदे, शेखर रेळेकर, अनिल शिंदे, सुमित सुतार, रोहित शिंदे, राहुल जाधव, हर्ष सोनवणे, पप्पू काकडे, संतोष पवार, नन्या लंभाते, सनी आंबेकर, भैया शिंदे, अवधुत कदम, रोहन माळवे, सागर पालकर, दिपक शिंदे, गणेश धायगुडे इत्यादींनी परिश्रम घेतले. सदरच्या पारंपारिक नागपंचमी कार्यक्रमास शहरातील महिला, युवती, बालगोपाळ यांनी मोठया संख्येने उपस्थिती दाखवून आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रहिम तांबोळी यांनी केले.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!