फलटण : मराठा आरक्षणासाठी गेली चार दिवस फलटण येथील अधिकार गृहासमोर मराठा क्रांती मोर्चा यांच्यावतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. रविवारी चौथ्या दिवशी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर हे सरकार चालढकल करत असल्याचा निषेधार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी मुंडन करून सरकारचे श्राद्ध घातले. या वेळी एक मराठा लाख मराठा घोषणा देण्यात आल्या आणि शासनाचा निषेध करण्यात आला.