राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पनेला प्रतिसाद देत फलटणच्या विजय फाऊंडेशन व फलटण तहसिल कार्यालयातील नागरिक सुविधा केंद्र (सेतू) यांच्या वतीने स्वराज्याचा साक्षीदार असलेला “किल्ले संतोषगड” या किल्ल्यावर वृक्ष लागवड करून आपली सामाजिक बांधीलकी जोपासली आहे या वेळी नागरिक सुविधा केंद्राचे ( सेतू) व्यवस्थापक शेखर लांभाते म्हणाले की फलटण तालुक्यातील एकमेव किल्ला संतोषगड आहे याचे संगोपन करणे आपले आद्य कर्तव्य आहे, म्हणून विजय फाऊंडेशन चे संस्थापक श्री विजय भिसे सर यांच्या संकल्पनेतून सामजिक बांधीलकी जोपासत आज वृक्ष लागवड केली असून आणि त्याचे संगोपन करणार असल्याचे म्हटले आहे या पुढे संतोषगडाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न सर्व स्तरातून करणार असल्याचे विजय फाऊंडेशन चे संस्थापक श्री विजय भिसे सर यांनी म्हटले आहे त्यास राजकुमार अहिवळे यांना अनुमोदन दिले तसेच ,संदीप सस्ते ,सुभाष चौरे ,दीपक कांबळे ,अरुण सपकाळ ,गोरख कारंडे,शामराव वाघमोडे ,बापूराव येळे ,राहुल भोईटे,शिवाजी वाघमारे ,सौरभ सपकाळ ,तसेच श्रीकांत लांभाते ,सचिन पवार सर ,सूर्याजी जगताप ,सागर लांभाते यांनी उपस्थित होते .