राजुरी : आजच्या स्पर्धेच्या युगात युवकांनी प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर आणि अपार कष्टाने यशाचे शिखर पार करावे असे प्रतिपादन मा.श्री.दयानंद गावडे साहेब पोलिस निरिक्षक गुन्हे अन्वेशन विभाग पुणे यांनी केले.ते जय हनुमान उत्सव समितीने आयोजित केलेल्या गुणवतांच्या गुण गौरव समारंभात बोलत होते.
जय हनुमान उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य हे स्वखर्चातुन हा कार्यक्रम करत असतात हे खरच कौतुकास्पद आहे असे गौरवउद्गार त्यांनी काढले.
या वेळी गुणवरे येथील कै.संजय गांधी विद्यालय , मुंजवडी येथील खोलेश्वर विद्यालय ,बरड येथील माँडर्न हायस्कुल ,राजुरी येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालय ,आंदरुड माध्यमिक विद्यालय येथील या हायस्कुल व गावामधील ज्या इ.१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांनी ८०% पेक्षा जास्त गुण मिळवणार्या एकुण ३३ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा.श्री.टी.पी.शिंदे सर यांनी केले
प्रास्तविक जय हनुमान उत्सव समितिचे सदस्य मा.श्री.सिद्धार्थ रणदिवे यांनी केले.
समितीचे अध्यक्ष मा.श्री.नंदकुमार काशिद यांनी आभार मानले.