जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
फलटण टुडे वृत्तसेवा ( सोमनथळी दि. 26) :-
फलटण तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा दि. 23 व 24 ऑगस्ट 2024 रोजी सोमंथळी ता. फलटण येथील राधिका गार्डन येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली .
या स्पर्धेमध्ये 14 वर्षांखालील मुलांच्या वजनी गटामध्ये चि. सोहमसिंह निंबाळकर ( 57 किलो ) वजनी गटात प्रथम क्रमांक , चि. समर्थ शिंदे (68 किलो ) वजनी गटात प्रथम क्रमांक, चि. ज्ञानराज पिसाळ (62 किलो ) वजनी गरात प्रथम क्रमांक , चि . वरद खानविलकर द्वितीय क्रमांक संपादन केला .
तर 14 वर्षाखालील फ्रि स्टाईल मुलींच्या गटात कु. श्रेया धायगुडे (36 किलो) वजनी गटात प्रथम क्रमांक , कु. गौरी चव्हाण (65 किलो) वजनी गटात प्रथम क्रमांक , कु.विद्या जाधव ( 57 किलो) वजती गटात प्रथम क्रमांक संपादन केला
तर ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील ग्रिको रोमन कुस्तीमध्ये
कु. साई तांबे (48 किलो ) वजनी गटात प्रथम क्रमांक तर 19 वर्षाखालील ग्रिको रोमन कुस्तीमध्ये चि. माऊली वाघमोडे (87 किलो) वजनी गटात प्रथम क्रमांक
सर्व यशस्वी कुस्तीपटूंचे व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक (वस्ताद )श्री डी. एन. जाधव यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा विद्यमान विधान परिषद सदस्य आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा , प्राचार्य श्री सुधीर अहिवळे, माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री नितीन जगताप, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने , पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र चॅम्पियन पै. राहूल सरक तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत