फलटण टुडे वृत्तसेवा (म्हसवड दि.28) : –
जगप्रसिद्ध हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो ,कबड्डी ,बुद्धिबळ अॅथलेटिक्स, या खेळांचा समावेश असून सदर स्पर्धा गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहेत. सदर स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयीन विकास समितीचे व्हाईस चेअरमन व फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य अॅड.श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने असणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस.जी. दीक्षित हे असणार आहेत. फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेनुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांच्या मध्ये असणारे खेळातील सुप्तगुणांना वाव मिळावा व त्यांच्यामध्ये स्पर्धेचे पोषक वातावरण तयार होऊन विद्यार्थ्यांचा विकास व्हावा व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व विद्यार्थ्यांना खेळाचे हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सदर स्पर्धा घेण्याचा मुख्य हेतू आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी नऊ 9.00 वा. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरती होणार आहे. सदर वार्षिक क्रीडा स्पर्धेबद्दल विद्यार्थ्यांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी शारीरिक शिक्षण संचालक प्रा. शेंडगे टी .एम. व सहाय्यक शारीरिक शिक्षण संचालक श्री .बापूराव कोळेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिमखाना विभाग समितीने केले आहे.