फलटण टुडे वृत्तसेवा ( बारामती ): –
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जागतिक जयंती महोत्सव समिती बारामती यांच्या वतीने सेवा निवृत्त ग्रामविकास अधिकारी गोविंदराव काशिनाथ खटके अंबिका नगर बारामती यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार मा. खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते देण्यात आला याप्रसंगी युवा नेते युगेंद्र पवार व सतीश खोमणे दशरथ राऊत, ऍड गुलाबराव गावडे, ऍड गोविंद देवकाते, समितीचे अध्यक्ष बबनराव आटोळे व उद्योजक संजय खटके आदी मान्यवर उपस्तीत होते.गोविंदराव खटके यांनी ग्रामसेवक ते ग्रामविकास अधिकारी (कृषी) क्षेत्रात काम करताना शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष योगदान दिले शेती अवजारे साहित्य इत्यादी पुरवण्यात बारामती तालुक्याने आघाडी घेतली होती त्याच्या त्यांच्या या योगदानाबद्दल सदर पुरस्कार त्यांना देण्यात आला.फोटो ओळ: राजू शेट्टी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना गोविंदराव खटके व उपस्तीत मान्यवर