फलटण टुडे वृत्तसेवा (बारामती ): –
बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघ च्या वतीने नाग पंचमी निमित्त महिलां साठी पारंपरिक वेशभूषा व मेहंदी स्पर्धेचा आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी बारामती नगर परिषदेच्या मा. नगराध्यक्षा जयश्री सातव, व शुभांगी जामदार, छायाताई कदम, कल्पना शिंदे, विजया कदम व जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण व कार्यकारणी पदाधिकारी व सदस्या उपस्तीत होत्या.पारंपरिक वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रथम दिशा सावंत, द्वितीय अश्विनी भोसले, तृतीय प्रज्ञा काटे व मेहंदी स्पर्धेमध्ये प्रथम जिया आत्तार,द्वितीय नाजनीन पठाण व तृतीय सुचित्रा शिंदे यांनी क्रमांक पटकाविला.परीक्षक म्हणून मंगला बोरावके, शुभांगी महाडिक ,सुमय्या महंत यांनी काम पाहिले.महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा भारतीय संस्कृतीमधील सण उत्सव साजरे करण्याचा आनंद व समाधान मिळावे म्हणून सदर कार्यक्रम चे आयोजन केल्याचे अध्यक्ष स्वाती ढवाण यांनी सांगितले .या प्रसंगी महिलांनी मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, पर्यावरण व पाणी वाचवा आदी सामाजिक विषयावर प्रबोधन पर उखाणे सादर केले.सूत्रसंचालन अर्चना शेंडगे यांनी केले आभार मनीषा शिंदे यांनी मानले.फोटो ओळ: बक्षिस वितरण प्रसंगी मान्यवर,जिजाऊ सेवा संघ च्या पदाधिकारी व विजेते