मुधोजी महाविद्यालयातील खेळाडूंचा संस्था वर्धापन दिनानिमित्त गुणगौरव
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि. 28 ) :-
फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण या नामांकित संस्थेचा 25 ऑगस्ट 2024 रोजी मुधोजी दिन व संस्था वर्धापन दिन मोठया उत्साहात पार पडला .
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉ. शिवाजीराव कदम साहेब, कुलपती,भारती विद्यापीठ, पुणे.हे उपस्थित होते. यावेळी मुधोजी महाविद्यालयातील विविध खेळमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या क्रीडा विभागातील खेळाडूंना यावेळी गौरवण्यात आले. यामध्ये कु. ऋतिका कदम – जलतरण, पूजा फडतरे – खो-खो,श्रद्धा शिंदे-हॉलीबॉल,आदित्य धुमाळ – हॉलीबॉल,गीतांजली बंडगर – बॉक्सिंग,भावेश रायते – हॉकी,
अजित श्रीराम – तिरंदाजी,विशाल कोकरे – कुस्ती,ऋतुजा पवार – कुस्ती
या सर्व खेळाडूंचे व त्यांच्या मार्गदर्शक प्रशिक्षक यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा विधान परिषद विद्यमान आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फ ए सोसा. चे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फ ए सोसा. चे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र कोको असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी श्री.अरविंदनिकम, प्राचार्य डॉ. पी.एच.कदम, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.