फलटण टुडे (म्हसवड दि. 30) : –
शालेय व विद्यापीठ स्तरीय शिक्षण घेत असताना विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन विद्यार्थी आपला सर्वांगीण विकास करू शकतात. खेळातून नेतृत्व गुण संघ भावना समानता यासह विविध गुणांचा विकास होऊन खेळातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते असे प्रतिपादन अॅड. श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवड मध्ये 29 ऑगस्ट 2024 रोजी जगप्रसिद्ध हॉकीचे जादूगार महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयांमध्ये आयोजित केलेल्या वार्षिक क्रीडा स्पर्धा 2024 च्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून मा. अॅड.श्रीमंत पृथ्वीराज राजेमाने, सदस्य, गव्हर्निंग कौन्सिल ,फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, प्रमुख उपस्थिती श्री. अनिल वाघमोडे ,पी.एस.आय ,म्हसवड पोलीस स्टेशन, म्हसवड , कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.एस.जी.दीक्षित प्रभारी प्राचार्य एस.बी.आर. कॉलेज, म्हसवड, व म्हसवड पोलीस स्टेशनचे श्री. लुबाळ श्री. भादुले श्री .शिरतोळे, श्री. काळेल, सह महाविद्यालयातील विभाग प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धेसाठी सुविधा निर्माण करून दिल्या जातील.आणि या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. एस .जी. दीक्षित यांनी यावेळी मत व्यक्त केले. या वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्स व बुद्धिबळ ( मुले – मुली ) या खेळांचा समावेश करण्यात आलेला होता. सदर खेळाच्या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या आणि रंगतदार झाल्या. या वार्षिक क्रीडा स्पर्धेत महाविद्यालयातील 230 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते कबड्डी व खो-खो खेळाचे पंच यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्री. महेश सोनवले श्री .चंद्रकांत तोरणे श्री. संग्राम शिंदे यांचा समावेश होता. सदर वार्षिक क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. प्रवीण दासरे यांच्या शुभहस्ते व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. जी. दीक्षित , ज्येष्ठ प्रा. डॉ.एम.पी. सोनवणे, नॅक कॉर्डिनेटर प्रा.डी.जे.रणवरे यांच्यासह जिमखाना कमिटीचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मेडल व ट्रॉफी , प्राविण्य प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समारंभचे सूत्रसंचालन श्री. शेंडगे टी.एम. यांनी केले व आभार श्री. बापूराव कोळेकर यांनी मानले.
