क्रीडा दिना निमित्त मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य डॉ पी एच कदम उपप्राचार्य ज्ञानदेव देशमुख फिजिकल डायरेक्टर स्वप्निल पाटील व इतर मान्यवर
फलटण टुडे (फलटण दि १) : –
मुधोजी महाविद्यालय,फलटण शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत 29 ऑगस्ट 2024 रोजी “राष्ट्रीय क्रीडा दिन” हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त वार्षिक क्रीडा स्पर्धामध्ये खालील खेळांचे आयोजन करण्यात येणार आले,हॉलीबॉल,खो-खो,कबड्डी तसेच IQC व शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांनी मुधोजीयन्स स्पोर्ट्स प्रश्नमंजुषा ही ऑनलाइन स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली.ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य प्रा.संकेत पाटील यांचे लाभले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक क्रीडा विभागप्रमुख प्रो.डॉ.स्वप्निल पाटील यांनी केले व मा. प्राचार्य प्रो.डॉ.पी.एच.कदम यांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन झाले व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करून सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले,उपप्राचार्य देशमुख सर व IQC कोऑर्डिनेटर प्रो. डॉ. टी.पी.शिंदे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार डॉ. संग्राम मोरे यांनी मांडले सर्व क्रीडा समिती सदस्य व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवक उपस्थित होते.