फलटण टुडे वृत्तसेवा ( ताथवडा दि 04 ) :-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील वयोगटांमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला संघनायक आदित्य चव्हाण व त्याची संपूर्ण टीमने उत्तम खेळाचे प्रदर्शन केले तसेच क्रीडा विभाग प्रमुख श्री निंबाळकर सर क्रीडा शिक्षक श्री सुळ सर प्रशिक्षक श्री बिचुकले सर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. याप्रसंगी फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे चेअरमन श्री नितीन शेठ गांधी व सर्व सदस्य तसेच सोसायटीचे प्रशासनाधिकारी श्री निकम सर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेडगे सर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दालवडी पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थ यांनी विजय संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.