14 व 17 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल ( सी बी एस सी ) विजेते ठरले तर मुधोजी हायस्कूल चे संघ उपविजेते .
फलटण टुडे वृत्तसेवा ( फलटण दि. 04) :-
फलटण तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा दि. 2 व 3 ऑगस्ट 2024 रोजी फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेसाठी 14 वर्षाखालील, 17 वर्षाखालील व 19 वर्षाखालील मुलांच्या संघांनी सहभ नोंदवला तर मुलींच्या 14 व 19 वर्षाखालील संघानी सहभाग नोंदवला .
या शालेय फुटबॉल स्पर्धेमध्ये मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणच्या 19 वर्षाखालील संघाने श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सी बी एस ई) जाधववाडी या संघाचा 2 / 0 अशा फरकाने पराभव केला व जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र झाला .
तर 14 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेमध्ये श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल जाधववाडी (CBSE ) संघाने मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज संघाचा 1/0 अशा फरकाने पराभव केला तर 17 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेमध्ये श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सी बी एस सी ) या संघाने मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण या संघाचा 2 / 0 या फरकाने पराभव केला .व वरील विजेते संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.
यामध्ये 14 वर्षाखालील मुलींचा श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल व बी जे इंग्लिश मीडियम स्कूल सात सर्कल, फलटण यांच्यामध्ये अंतिम सामना झाला व त्यामध्ये श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल ( CBSE ) मुलींच्या संघाने 1 / 0 फरकाने हा सामना जिंकला .व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली . 17 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेमध्ये श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल ( CBSE ) व बी जे इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यामध्ये अंतिम सामना झाला व हा सामना 2 / 0 फरकाने जिंकत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE ) मुलींचा संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता ठरला.
वरील विजेत्या संघाचा बक्षीस वितरण समारंभ विविध मान्यवरच्या उपस्थितीत पार पडला यामध्ये श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री महादेवराव माने, युवा उद्योजक श्री तुषारभैय्या नाईक निंबाळकर, जेष्ठ फुटबॉल खेळाडू तथा प्रशिक्षक श्री संजय फडतरे, जेष्ठ राष्ट्रीय खो- खो खेळाडू श्री रत्नसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते पार पडला .यावेळी विविध मान्यवर व फुटबॉल प्रेमी उपस्थित होते. यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या संघास चषक देऊन सन्मानित करण्यात आले .
या स्पर्धेचे आयोजक म्हणून श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE ) जाधववाडी व फलटण जिमखाना ने पार पाडली या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक श्री अमित काळे यांनी तर पंच म्हणून श्रवण वळकुंदे , खरात यांनी काम पाहिले.
19 वर्षाखालील मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज संघाच्याया विजयाबद्दल संघाच्या खेळाडूचे व मार्गदर्शक प्रशिक्षक श्री अमोल नाळे व संकेत मठपती यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा विद्यमान विधान परिषद सदस्य आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा समितीचे चेअरमन श्री शिवाजीराव घोरपडे, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, तपासणी अधिकारी श्री दिलीप राजगुडा , प्राचार्य श्री सुधीर अहिवळे, माध्यमिकचे उपप्राचार्य श्री नितीन जगताप, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री सोमनाथ माने , पर्यवेक्षिका सौ पूजा पाटील, फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य, क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सचिव श्री सचिन धुमाळ व सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या आहेत.